🎨 डिझाईनसाठी पैसे किती घ्यायचे?
फ्रीलान्स डिझायनर्ससाठी प्राईसिंग गाईड
लेखक: सुरज दुर्गे | MarathiDesigns.com
ग्राफिक डिझायनिंग करताना अनेक वेळा एकच प्रश्न ऐकायला येतो –
"याचं चार्ज किती?"
कीवा
"फक्त एवढ्यासाठी एवढे पैसे का?"
हा प्रश्न खरंतर क्लायंटचा नाही, तर आपल्याच डिझायनर मंडळींचा गोंधळ असतो –
आपणच ठरवत नाही की आपल्या कामाची किंमत किती असावी!
आजच्या या ब्लॉगमध्ये आपण पाहणार आहोत:
-
फ्रीलान्स डिझायनरने चार्ज कसे ठरवावे?
-
Time-based, Project-based आणि Value-based pricing म्हणजे काय?
-
आणि एक प्रॅक्टिकल पद्धत, जी सुरवातीला उपयोगी पडेल.
💡 १. डिझायनरची किंमत "किमतीत" नाही, तर "मूल्यात" असते
डिझाईन म्हणजे केवळ सौंदर्य नव्हे. ते एका ब्रँडचं identity तयार करतं. जर तुमचा बिझनेस लाखोंची उलाढाल करत असेल, तर त्याच्या बॅनर, पोस्टर्स, लोगो किंवा वेबसाइटमध्ये डिझाईनचा impact किती मोठा असेल, याचा विचार करा!
👉 म्हणूनच काही वेळा एक logo सुद्धा ₹500 मध्ये होतो आणि कधी ₹50,000 मध्येही.
⏳ २. Time-Based Pricing (तासानुसार चार्ज करणे)
यात आपण आपल्या वेळेप्रमाणे पैसे घेतो.
उदा. एका बॅनरवर तुम्ही 2 तास काम करता, आणि तुमचा तासाचा दर ₹300 असेल, तर चार्ज ₹600.
फायदे:
-
Transparent आहे.
-
Long-term प्रोजेक्टसाठी योग्य.
तोटे:
-
ग्राहकांना वाटतं की तुम्ही "जास्त वेळ घेतलात", तेव्हा ते कमी पैसे द्यायला बघतात.
📦 ३. Project-Based Pricing (कामानुसार चार्ज)
एक विशिष्ट डिझाईनसाठी ठराविक रक्कम घेतली जाते.
उदा. Social Media Banner = ₹350
Flex Design = ₹500
Logo Design = ₹2000+
फायदे:
-
दोघांनाही स्पष्टता असते.
-
आपण वेळेचा हिशोब न लावता गुणवत्ता देऊ शकतो.
टिप:
-
प्रत्येक प्रकारच्या डिझाईनसाठी rate card तयार ठेवा.
💰 ४. Value-Based Pricing (कामाच्या परिणामावर आधारित)
हे सर्वात प्रभावी पण प्रगत स्तराचं प्राइसिंग आहे.
डिझाईनमुळे क्लायंटला किती फायदा होणार आहे, त्यावरून प्राइस ठरतं.
उदा. जर तुमचा डिज़ाईन एखाद्या ब्रँडचा ब्रँड व्हॅल्यू वाढवतो, किंवा सेल्समध्ये फरक पाडतो – तर त्या डिझाईनची किंमत त्या impact वरून ठरते.
📋 ५. रेट कार्ड बनवताना लक्षात घ्या:
-
आपला अनुभव (नवीन आहात की अनुभवी?)
-
तुमचा वेळ व कौशल्य
-
क्लायंट कोण आहे? (स्वतःचा छोटा बिझनेस vs मोठा कॉर्पोरेट)
-
काम किती वेळ घेणार आहे?
-
Revisions किती असणार?
-
फायनल आउटपुट काय? (JPEG, PSD, Editable?)
✋ ग्राहक विचारतो तेव्हा काय म्हणायचं?
"सर, मी तुम्हाला फक्त डिझाईन नाही देतो –
तुमच्या ब्रँडसाठी एक प्रभावी solution देतो."
✨ माझा अनुभव:
मी सुरुवातीला ₹100 मध्ये पोस्टर्स बनवत होतो. कारण तेव्हा मला वाटत होतं, "क्लायंट मिळणं महत्वाचं".
पण नंतर लक्षात आलं – काम फक्त स्वस्त देण्याने टिकत नाही. तुम्ही स्वतःच्या कामाची किंमत योग्य घेतली पाहिजे, नाहीतर लोक तुमचं कौशल्य कमी लेखतात.
🔚 निष्कर्ष
-
दर ठरवताना घाई करू नका.
-
तुमचं काम काय बदल घडवू शकतं, हे समजून घ्या.
-
रेट कार्ड तयार ठेवा आणि प्रामाणिकपणे communication करा.
डिझाईन म्हणजे केवळ कला नव्हे – ती एक सेवा आहे. आणि चांगल्या सेवेची योग्य किंमत असतेच.